चांदवड : चांदवड तालुक्यात रासायनिक खतांच्या, विशेषतः युरियाच्या, तीव्र तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे शेती कामांना मोठा फटका बसत असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक १६ जुलै २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या चांदवड तालुका शाखेने तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती अधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात, चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध होत नसल्याने त्यांना शेतीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वेळेवर खत न मिळाल्यास पिकांवर विपरीत परिणाम होऊन उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मा. संतोष केदारे, तालुका महासचिव प्रवीण वानखेडे, तालुका संघटक ऋषिकेश बोराडे, तालुका सदस्य महेश सोनवणे, तुषार निरभवणे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर त्वरित लक्ष घालून खतांचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली.
Crime : धुळे जिल्ह्यामध्ये १६ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत
धुळे : शिरपूर तालुक्यातील रुपसिंगपाडा गावामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या...
Read moreDetails