कुटुंब परिवाराची वंचित आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी यांनी केले सांत्वन
मनोज झेंडे (नाभिक) रा.सांजा ता.जि.उस्मानाबाद, व्यवसाय न्हावी, वय 40 वर्ष यांनी कोरोनाच्या सततच्या लाॅकडाऊनमुळं परिवाराच्या पालन-पोषानाच्या चिंतेतुन चिठ्ठी लिहुन दि.11 एप्रिल 2021 रोजी, विषारी औषध घेवून जीवनयाञा संपविली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. खरं अशा प्रकारे परिवाराच्या उपजिवीच्या चिंतेतुन जीवनयाञा संपविणे म्हणजे अपयशी राज्य सरकारच्या आणि बेजबाबदार प्रशासनाचे प्रचंड मोठे अपयश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकार्यांनी या पिडित परिवाराला भेट देवून सांत्वण करत अत्यावश्यक ती मदत करण्यात येईल असे पिडित परिवाराला सांगितले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जि. महासचिव मा.बाबासाहेब जानराव, वंचित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अँड.जिनत प्रधान, मा.वाघमारे विद्यानंद, मा.विजय बनसोडे, मा.नामदेव वाघमारे, मा.रविंद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.