झारखंड : बोकारो जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारानंतर पैसे न दिल्याने एका क्रूर डॉक्टरने रुग्णावर कैचीने जीवघेणा हल्ला केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतणपूर येथे राहणारा गोविंद बाउरी हा रुग्ण डॉक्टर पी. कुमार यांच्याकडे उपचारासाठी गेला होता. उपचारासाठी त्याने काही पैसे दिले, पण उरलेले २०० रुपये त्याने नंतर देतो असे सांगितले. यासाठी त्याने डॉक्टरांकडून दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, डॉक्टर कुमार यांनी आपल्या दवाखान्यात गोविंदवर कैचीने पाठीवर, छातीवर आणि चेहऱ्यावर वार केले. यामुळे गोविंद गंभीर जखमी झाला आहे.
पैशांच्या वादातून डॉक्टरांनी केले वार
सतणपूर गावातील एका खोलीत डॉक्टर पी. कुमार आपला दवाखाना चालवतो. सोमवारी, गोविंद बाउरी हा कामावरून परत येत असताना डॉक्टरने त्याला बोलावले आणि उरलेले पैसे मागितले. त्यावेळी गोविंदने त्याला आणखी दोन आठवड्यांची मुदत मागितली. यावर डॉक्टर संतापले आणि त्यांनी कैचीने गोविंदवर हल्ला केला. गोविंदच्या पाठीवर चार वार करण्यात आले, तसेच चेहऱ्यावरही वार केल्याने डोळा थोडक्यात बचावला. गंभीर जखमी अवस्थेत गोविंदने तिथून पळ काढला आणि थेट पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार झालेल्या आरोपी डॉक्टरला लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार – प्रकाश आंबेडकर
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विविध कामगार संघटना यांच्यात २८ जुलै रोजी झालेल्या कराराचा फेरविचार करण्याची मागणी मुंबई म्युनिसिपल कामगार...
Read moreDetails