Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धनेगाव येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 22, 2023
in बातमी
0
धनेगाव येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.
0
SHARES
172
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

तिढा निकाली निघेपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवा – जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक ह्यांच्या सूचना.

अकोला दि. २२- धनेगाव येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. वंचित चे नेते आणि जिल्हा परिषद पदाधिकारी ह्यांचे पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने आज तातडीने नियोजन भवनात पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आणि तिढा निकाली निघेपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवा, कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक ह्यांनी केले. टेम्पल कॉम्प्लेक्सच्या नावाने असलेल्या जागे बाबत ग्रामपंचायत ने निर्णय घेण्याचे आदेश पारित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्यांनी स्पष्ट केले.

मौजे धनेगाव तालुका बाळापूर येथील बौद्ध मंडळींनी धार्मिक प्रयोजना साठी राखीव असलेल्या जागेवर इतर धर्मीय व बौद्ध समाजासाठी समान जागा राखीव करण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन ह्यांनी निर्णय घेतला नाही. काल गावातील तरुणांनी पंचशील ध्वज स्थापित केला होता, परंतु गावातील स्थानिक पोलीस पाटील आणि सरपंच यांनी बाळापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जुमळे यांच्याशी संगनमत करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदर पंचशील ध्वज काढून घेण्यात आला. त्याचप्रमाणे समस्त बौद्ध मंडळींना दमदाटी करण्यात आली. त्यामुळे संतप्त बौद्ध समाजातील गावकरी, तरुण, महिला व लहान मुले हे अकोल्यात दाखल झाले होते.

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे सर, जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांना सकाळी ९ वाजता अशोक वाटिका येथे येऊन भेटले त्यांच्या समक्ष सर्व परिस्थिती गावकऱ्यांनी सांगितली त्यांच्याकडे असलेला नकाशा त्यांनी दाखविला राजेंद्र भाऊ पातोडे यांनी सदर प्रकरणांमध्ये वाद होऊ नये त्याचप्रमाणे दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून अकोला जिल्हा प्रशासनासोबत संपर्क करून जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे गावकरी आणि जिल्हा प्रशासनासोबत समन्वय बैठक घेतली त्यामध्ये गावकऱ्यांच्या वतीने त्यांची समस्या जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली आणि माननीय जिल्हाधिकारी महोदया आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या माध्यमातून जातीय सलोखा कायम राहील आणि कोणत्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याच्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश पोलीस प्रशासन आणि गावातील जनतेस केले ह्यावेळी राजेंद्रभाऊ पातोडे यांनी गावकऱ्यांच्या वतीने सर्व हकीकत प्रशासनासमोर मांडली.

त्यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जि प समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे, संजय नाईक, मंगेश गवई, गुलाब उमाळे, सचिन शिराळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश दे. शिरसाट, नाजुकराव इंगळे, माजी सरपंच रेखाताई इंगळे, उपसरपंच उमाताई इंगळे, देवानंद इंगळे, प्रदिप इंगळे, निलेश इंगळे ,ॲड. सुबोध डोंगरे, आनंद खंडारे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुणबी, सुजित तेलगोटे, उमा प्रल्हाद इंगळे, इंदूबाई गणपत इंगळे,राजकन्या देवानंद तेलगोटे,रामा प्रकाश इंगळे,निळू विशाल इंगळे,प्रभा वासुदेव इंगळे,गौकर्णा सुखदेव इंगळे,माया जगजीवन इंगळे,अंकिता चंद्रशेखर इंगले,माला प्रीतम घ्यारे, कुसुमबाई माणिकराव इंगळे,महिमा प्रदीप इंगळे,संगीता अनिल इंगळे,माया शैलेश इंगळे,मीरा रविकिरण इंगळे,शालू नाजूकराव इंगळे,पुष्पा महादेव इंगळे,कल्पना गनेश इंगळे,सरला दिनेश इंगळे,सुनीता आनंद इंगळे,शीला रमेश इंगळे,अरुणा विनोद इंगळे,लक्ष्मी समाधान इंगळे,अन्नपूर्णा शिराम इंगळे,प्रमिला शिवराम इंगळे,रुपाली जनार्धन इंगळे,मकर्णा देवराव इंगळे,संगीता संतोष इंगळे,लता अरुण आंबोरे,वच्छला कैलास सुरवाडे,सीमा सुनील सुरवाडे,मीना विलास सुरवाडे,शीला मुरलीधर निखाडे,मंजू साहेबराव इंगळे,कल्पना दिलीप तायडे,अर्चना सिध्दार्थ इंगळे,अन्नपूर्णा शेषराव इंगळे,रत्नबाई भीमराव इंगळे,शीतल राजेश इंगळे,अर्चना मदन सोनोने, मंगला अरुण सदार, तसेच असंख्य गावकरी व कार्यकर्ते हजर होते.


       
Tags: AkolaBuddhistDhanegaoMaharashtraRajendra PatodeVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

मा. सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते बेस्ट जनता-२०२३ पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न..!

Next Post

कुठल्याही पुराव्या आणि चौकशी शिवाय डेटा लीक झाला नसल्याचा एमपीएससीचा दावा दिशाभूल करणारा – राजेंद्र पातोडे.

Next Post
कुठल्याही पुराव्या आणि चौकशी शिवाय डेटा लीक झाला नसल्याचा एमपीएससीचा दावा दिशाभूल करणारा – राजेंद्र पातोडे.

कुठल्याही पुराव्या आणि चौकशी शिवाय डेटा लीक झाला नसल्याचा एमपीएससीचा दावा दिशाभूल करणारा - राजेंद्र पातोडे.

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी
बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते ...

June 21, 2025
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या
बातमी

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

नवी मुंबई : मस्करीची कुस्करी झाली. तुर्भे येथील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आली. ही घटना ...

June 21, 2025
IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा ; ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल ...

June 21, 2025
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर
बातमी

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

June 21, 2025
कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!
बातमी

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

June 20, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क