मुंबई : दिल्लीतील स्फोट प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना देशातील सुरक्षा यंत्रणेवर आणि पूर्वीच्या स्फोट प्रकरणांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या स्फोटामागे ‘कोणीतरी’ नक्कीच आहे आणि हे प्रकरण अंतर्गत (Internal) आहे की बाह्य (External) याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘इंटर्नल बॉम्बस्फोट’ आणि संघाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा
ॲड. आंबेडकर यांनी सध्याचा स्फोट हा अंतर्गत (Internal) स्वरूपाची असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. यावर त्यांनी म्हणाले की, “आता काहीजण म्हणतील की ‘इंटर्नल बॉम्बस्फोट झाले नाहीत’, पण प्रत्यक्षात हे स्फोट अंतर्गत स्वरूपाचेच आहेत. जेवढं स्फोटक साहित्य (मटेरियल) सापडलं आहे, ते संघाच्या कार्यकर्त्यांकडेच आढळलं आहे.” त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अशा घटना भविष्यात थांबवल्या पाहिजेत, यावर जोर दिला.
मागील स्फोटप्रकरणांची चौकशी दडपल्याचा आरोप
संघाचा या प्रकरणांशी संबंध असल्याच्या आपल्या शंकेचे कारण स्पष्ट करताना ॲड. आंबेडकरांनी देशात यापूर्वी झालेल्या काही महत्त्वाच्या स्फोट प्रकरणांचा संदर्भ दिला. या प्रकरणांची चौकशी नीट झाली नाही किंवा त्यात काहीच निष्पन्न झाले नाही, असे ते म्हणाले.
‘फडणवीसांनी खुर्ची वाचवण्यासाठी कुणबी जीआर काढला’; ओबीसींनी ‘त्या’ तीन पक्षांना मतदान करू नका – ॲड प्रकाश आंबेडकर
नांदेड प्रकरण ची चौकशी नीट झाली नाही, मालेगाव केसमध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. अजमेर प्रकरण तसंच राहिलं (पुढे तपास झाला नाही).
मुंबई स्फोट (कबूतरखाना आणि गिरगाव): या घटनांची माहिती नीटपणे बाहेर आली नाही. पुणे स्फोट (फर्ग्युसन कॉलेज आणि हॉटेल): फर्ग्युसन कॉलेजमधील स्फोटातील व्यक्ती नंतर कुठे गेली हे अज्ञात आहे, तसेच हॉटेलमधील स्फोटाबद्दलही ठोस माहिती उपलब्ध नाही. “हे सगळे जर इतके अनडिस्क्लोज्ड आणि अनइन्वेस्टिगेटेड राहिले असतील, तर हा एक गंभीर प्रश्न आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सुरक्षा यंत्रणेत ‘गंभीर त्रुटी’
गेल्या काही दिवसांपासून स्फोटके आणि संबंधित घातक साहित्य पकडण्यात आले होते आणि पोलिसांना याबाबत अलर्टसुद्धा दिला गेला होता. तरीही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
संसदेवर (पार्लमेंटवर) हल्ल्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि आपल्या सुरक्षा यंत्रणेत (सिक्युरिटी सिस्टीममध्ये) गंभीर त्रुटी (Exposure) झालेल्या आहेत, हे स्पष्ट होते असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.






