Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 28, 2024
in राजकीय
0
काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई :सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागात मिळत आहे असेही त्यांनी म्हटले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. मी असे म्हणेन की, काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावे लागेल की, बळी का बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उध्दव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे.

ॲड. आंबेडकरांनी भाजप आणि मोदी यांच्यावर ही निशाणा साधला ते म्हणाले की, 2014 पासून ते आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सरकार स्वतःच म्हणत आहे. आम्ही असे म्हणतो की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यावेळी याच चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन सर्व्हेनुसार भाजप कुठेही 200 पार करत आहे, असे दिसत नाही.

अमित शहा यांनी समान नागरी कायदा लागू करणार असे वक्तव्य एका सभेत केले होते यावर ॲड. आंबेडकर यांनी समान नागरी कायदा भाजपने करूनच दाखवावा. भाजप आणि आरएसएस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल असे मला वाटत नाही. तो संसदेचा कायदा आहे. संविधानाने प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली आहे. असे सांगितले.


       
Tags: bjpCongressLoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही

Next Post

मुस्लिम समाज वसंत मोरे यांच्यासोबत राहील

Next Post
मुस्लिम समाज वसंत मोरे यांच्यासोबत राहील

मुस्लिम समाज वसंत मोरे यांच्यासोबत राहील

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: ‘वंचित’ आता निर्णायक शक्ती – प्रा. डॉ किशोर वाघ
बातमी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: ‘वंचित’ आता निर्णायक शक्ती – प्रा. डॉ किशोर वाघ

by mosami kewat
December 21, 2025
0

- प्रा. डॉ किशोर वाघ आज नगरपंचायती आणि नगरपरिषदांचे निकाल हाती आले आहेत. शहरी भागांसाठी कार्यरत असलेल्या या स्थानिक स्वराज्य...

Read moreDetails
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची जोरदार मुसंडी !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची जोरदार मुसंडी !

December 21, 2025
दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

December 21, 2025
वंचितच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आज राज्यभर दिसत आहे – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

वंचितच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आज राज्यभर दिसत आहे – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

December 21, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन !

वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन !

December 21, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home