Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

LPG Prices Hike : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेल व्यवसायावर वाढणार आर्थिक ताण

mosami kewat by mosami kewat
June 1, 2026
in बातमी, सामाजिक
0
LPG Prices Hike : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेल व्यवसायावर वाढणार आर्थिक ताण

LPG Prices Hike : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेल व्यवसायावर वाढणार आर्थिक ताण

       

नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक ग्राहकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केली असून, नवीन दर 1 जूनपासून लागू करण्यात आले आहेत. या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे तसेच इतर व्यावसायिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन दरांनुसार, दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 42 रुपयांनी महागला असून त्याची किंमत आता 3,113.50 रुपये झाली आहे. तर कोलकात्यात प्रति सिलिंडर 53.50 रुपयांची वाढ झाल्याने त्याचा दर 3,255.50 रुपयांवर पोहोचला आहे. विविध महानगरांमध्ये वाढीचे प्रमाण वेगवेगळे असले तरी व्यावसायिक वापरासाठीच्या गॅसच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. (LPG Prices Hike)

Also Read : सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला केंद्राची मंजुरी; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचेही नाव

दरम्यान, 5 किलो क्षमतेच्या एफटीएल (फ्री ट्रेड एलपीजी) सिलिंडरच्या किंमतीतही 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत हा सिलिंडर आता 821.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

विशेष म्हणजे, यावर्षीच्या सुरुवातीपासून व्यावसायिक एलपीजीच्या दरवाढीचा क्रम कायम आहे. जानेवारी 2026 मध्ये दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1,691.50 रुपये होती. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत सलग वाढ करण्यात आली. विशेषतः मे महिन्यात तब्बल 993 रुपयांची वाढ झाल्यानंतर जूनमध्येही दरवाढ झाल्याने व्यावसायिक ग्राहकांची चिंता वाढली आहे. (LPG Prices Hike)

Also Read : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन

सतत वाढणारे इंधन, वाहतूक आणि ऊर्जा खर्च यामुळे व्यवसायांवरील आर्थिक दबाव आधीच वाढलेला असताना एलपीजीच्या नव्या दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यावसायिक क्षेत्राकडून या वाढीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.


       
Tags: Business NewsCommercial Gas CylinderCommercial LPG Price HikeCommercial LPG RatesEconomicEnergy Cost IncreaseFuel Price HikeHotel Business NewsLPG Cylinder CostlierLPG Cylinder Price IncreaseLPG News IndiaLPG Price NewsLPG Rate June 2026Restaurant Business India
Previous Post

पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Next Post

महाराष्ट्रातील बेपत्ता बालके : विकासाच्या दाव्यांतील सर्वात अस्वस्थ करणारे वास्तव

Next Post
महाराष्ट्रातील बेपत्ता बालके : विकासाच्या दाव्यांतील सर्वात अस्वस्थ करणारे वास्तव

महाराष्ट्रातील बेपत्ता बालके : विकासाच्या दाव्यांतील सर्वात अस्वस्थ करणारे वास्तव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर
बातमी

धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !धम्मचक्र प्रवर्तन दिन ही केवळ धार्मिक घटना नसून अन्यायाविरुद्ध दिलेले आव्हान – अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
October 22, 2026
0

अकोला : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ निमित्त अकोला येथे...

Read moreDetails
साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

साहिल वाकोडे प्रकरणावरून सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल; म्हणाले, आंबेडकरी चळवळच आपल्या पाठीशी उभी राहते

October 22, 2026
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

October 22, 2026
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

October 20, 2026
केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

October 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home