वंचित बहुजन आघाडीचा संवाद दौरा
वाशिम : येणारा काळ अत्यंत गंभीर असून वंचित समूहांना कोणत्याही परिस्थितीत एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी दिले. त्या गुरुवारी (दि.१७) रात्रीला वाशिम शहरातील फंक्शन हॉल येथे संवाददौऱ्या दरम्यान आयोजित सभेत बोलत होत्या यावेळी त्यांनी जन सुरक्षा कायद्याबाबतही परखड भाष्य केले. यावेळी विशेष अतिथी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव तथा वाशिम जिल्हा निरीक्षक माजी आमदार नतिकोद्दीन खतीब तर अध्यक्षस्थानी वाशीम विधानसभा मतदारसंघ निरीक्षक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तुषार गायकवाड होते.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पुढे बोलताना विशेषता वाशिम शहराच्या समस्यांना ऐरणीवर घेत यावेळी त्यांनी शहरातील नगर परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत तर खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशा वाढताहेत या विरोधात आवाज उठवायचा आहे त्याचप्रमाणे वाशिम शहरातील रस्त्यांची दयनीय व्यवस्था, पुरेशा पाण्याची सुविधा नसणे, लोकसंख्येच्या तुलनेत शहरात पुरेशा स्वच्छतागृहाचा अभाव, अशा प्रकारच्या मूलभूत सुविधांच्या साठी आम्हाला झगडावे लागेल आणि बदल घडवून आणावा लागेल असे त्यांनी सांगितले लोकसंख्येच्या तुलनेत एक बुरुजी धरणाची उंची वाढवायला पाहिजे होती त्या धरणातील गाळ काढायला पाहिजे होता.
मात्र काहीही झालेले नाही. चार-पाच वर्षे झाले प्रशासन आहे मात्र प्रशासन ढिम्मच आहे वाशिम शहरातील मोठ्या प्रमाणात जागा धन दांडग्यांनी बळकावल्याचेही त्यांनी सांगितले जोपर्यंत वंचित समूह एकत्र येत नाही तोपर्यंत आमचा कोणी वाली नाही असे सांगून आता जर आम्ही एकत्र नाही आलो तर भविष्यात आमच्या पाठीशी कोणी उभे राहणार नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी वाशिम जिल्हा निरीक्षक तथा पक्षाचे राष्ट्रीय सचिव नतीकोदिन खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेतृत्व प्रकाशभाऊ आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत जिल्हा परिषद असो की सहा ही पंचायत समिती असो की नगरपंचायत आणि नगरपरिषद असो येथे विजय मिळवायचा, याबाबत जिल्हाभरात आयोजित संवाद यात्रेला भक्कम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉक्टर तुषार गायकवाड यांनी बोलताना समस्त मुस्लिम बांधवांनी खुल्या दिलाने वंचित बहुजन आघाडी सोबत येऊन जिल्ह्यातील समस्त स्थानिक स्वराज्य संस्थांवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता मिळवू असे प्रतिपादन केले यावेळी श्री विद्वत्तत्सभा मुख्य समन्वयक भास्करभोजने यांनी ही समयोचीत मत व्यक्त केले.. आगामी नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई गिहें, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे अभिजीत राठोड विधानसभा प्रमुख, महासचिव श्री रंगनाथ धांडे, मार्गदर्शक दत्तराव गोटे, असलम सिद्दिकी नबी कुरेशी आयताज भाई मणियार, बाबा भाई, जमील भाई फिरोज भाई पठाण, सलमान आली जिल्हा प्रवक्तातथा बाजार समिती संचालक संदीप सावळे, युवा तालुकाध्यक्ष गोपाल पारीसकर गौतम खाडे भारत भगत सह मोठ्या प्रमाणात मंडळी उपस्थित होती मुस्लिम समाज बांधवांची ही उल्लेखनीय उपस्थिती या कार्यक्रमाला होती.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समस्त पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपरिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. गत वेळी झालेल्या वाशिम नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांनी प्रचंड काट्याची लढत दिली होती अत्यंत कमी फरकाच्या मताने वंचित बहुजन आघाडीला पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीकडे शहरातील दिग्गज राजकारणाचे लक्ष लागणार आहे
विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा उद्या गोवंडीमध्ये जन आक्रोश मोर्चा
मुंबई : गोवंडीतील एम पूर्व वॉर्डमधील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'जन आक्रोश मोर्चा' उद्या आयोजित करण्यात आला...
Read moreDetails






