जम्मू काश्मीर : किश्तवाडमध्ये माचैल माता मंदिराच्या वाटेवर ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या पुरात 45 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 70 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. गुरुवारी दुपारी 12.30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये दोन CISF जवानांचा समावेश आहे.
हा अपघात माचैल माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील चाशोटी गावात घडला. या घटनेमुळे अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीत 100 हून अधिक लोक जखमी झाले असून, त्यापैकी 37 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात आणि पद्दार येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ढगफुटीच्या वेळी माचैल माता यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक या भागात उपस्थित होते. यात्रेकरूंना 9500 फूट उंचीवर असलेल्या माचैल माता मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी चाशोटी गावात मोटार वाहनाने प्रवास करून त्यानंतर साडेआठ किलोमीटरची पायपीट करावी लागते.
सध्या जिल्हा पोलीस प्रशासन आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. बेपत्ता असलेल्या 200 लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'ओम शांति ओम' अशा...
Read moreDetails





