चंद्रपूर – वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हाची आढावा बैठक गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी राजेश बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका,महानगरपालिका, इ.निवडणुकांच्या संदर्भात चर्चा होऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त संख्येने लोकप्रतिनिधी निवडुन आणण्याच्या दृष्टीने नवनियुक्त प्रभारी राजेश बोरकर यांनी कार्यकर्त्यांना दिशानिर्देश दिले. व जिल्ह्यात संघटन मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी राजेश बोरकर (जिल्हा प्रभारी,चंद्रपूर ), कुशलभाऊ मेश्राम (विदर्भ समन्वयक नागपूर, वर्धा जिल्हा प्रभारी), राजुभाऊ झोडे (विदर्भ समन्वयक, गडचिरोली जिल्हा प्रभारी), कविताताई गैरकार (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी ,चंद्रपूर ), बंडुभाऊ ठेंगरे, धीरज बांबोडे तसेच अनेक जिल्हा पदाधिकारी व तालुका अध्यक्ष उपस्थित होते.