अकोला, दि.१२ -महापुरुषांचा अवमान करणे आणि मनोज गरबडे व इतर दोन तरुण आणि पत्रकाराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करणे आणि पोलीस कर्मचारी ह्यांचे निलंबन करायला लावणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ह्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारप्रतिबंध) सुधारित नियम २०१६ कलम कलम ३ (१) (व्ही) नुसार महापुरुषांचा अवमान करणे ह्या सदरात गुन्हे दाखल होणार असल्याने आणि देशभर त्यांचे कृती विरुद्ध जनशोभ निर्माण झाल्याने माफीनामा आणि गुन्हे मागे घेण्याची विनंती ही स्वताच्या बचावाची कृती असून हा राजकीय स्टंट असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.
महापुरुषांचा अपमान किंवा अनादर करणे . कलम ३ (१) (व्ही)’ आणि मनोज घरबडे व इतरांना खोट्या गुन्हा मध्ये अडकवले म्हणून (कलम ३ (१) (पी) आणि कलम ३ (१) (क्यू) नुसार गुन्हे दाखल करण्याबाबत राजेंद्र पातोडे ह्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच पोलीस महासंचालक आणि विभागीय पोलिस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी अधिकारी आणि पोलिस स्टेशन खदान अकोला ह्यांना ई मेल द्वारे ही फिर्याद केली होती. त्यानुसार, आज पुणे पोलीस आयुक्त ह्यांनी अंकुश शिंदे कमिशनर ऑफ पोलीस कार्यालय ह्यांना ही तक्रार वर्ग केली असून मुख्यमंत्री कार्यालयास पाठविलेली ही तक्रार पुढील कार्यवाही साठी आनंद लिमये गृह विभाग यांना पाठविण्यात आल्याचा ई मेल प्राप्त झाला आहे.त्यामुळे आपल्या विरुद्ध दाखल होणारा गुन्हा आणि देशभरात निर्माण झालेल्या रोषाला घाबरून चंद्रकांत पाटील ह्यांनी माफी मागितली आहे.मुळात मनोज घरवडे,धनंजय इजगज, विजय ओव्हल आणि पत्रकार ह्यांचे विरुद्ध चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ५५३/२०२२ नुसार गुन्हा दाखल गुन्ह्यात चंद्रकांत पाटील हे फिर्यादी नाहीत तर पोलीस कर्मचारी फिर्यादी आहे.भादवि कलम ३०७, ३५३, २९४, ५०० ५०१ १२०(ब) ३४ क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) / १३५ अन्वये दाखल खोट्या फिर्यादी मध्ये चिंचवड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक खराडे ह्यांनी तपासत तथ्य नसल्याने बी फायनल पाठवावे लागणार होते कारण सर्व फुटेज उपलब्ध असल्याने ही तकलादू केस न्यायालयात टिकणार नाही, ह्याची जाणीव चंद्रकांत पाटील ह्याना झालेली आहे.निषेध व्यक्त करणाऱ्या तरुणांना पोलिसांकरवी गंभीर गुन्ह्यात अडकवले आहे.त्यामुळे चंद्रकांत पाटील,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ह्यांच्या विरुद्ध दाखल होणारे गुन्हे आणि जनरेटा पाहून त्यांनी शरणागती पत्करली आहे.गृह खाते त्यांचे पक्षाचे ताब्यात आहे.मनोज गरबडे आणि इतर तीन जणांना तातडीने मुक्त करीत त्यांचे विरुद्ध दाखल गुन्हे रद्द झाल्या शिवाय चंद्रकांत पाटील आणि त्याचे माफीनामा आणि गुन्हे परत घेण्याचे विनंती हा राजकीय स्टंट ह्या पलीकडे काहीच नाही.
राजेंद्र पातोडे
9422160101