मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ‘संविधान सन्मान महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन, सामाजिक न्याय आणि लोकशाही बळकट करण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेकडून करण्यात आले आहे.
महासभेच्या तयारीसाठी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड तसेच राज्यातील सर्व जिल्हा शाखांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. २४ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम आयोजित करण्याचेही निर्देश दिले आहेत.
या महासभेत सामाजिक परिस्थिती, संविधानिक हक्क, लोकशाही मूल्ये आणि स्मरण यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.





