बुलडाणा : महाबोधी महाविहार बोधगया मुक्तीसह महू जन्मभूमी व नागपूर येथील दीक्षाभूमी मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज जन आक्रोश आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकभाऊ सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला व युवकांनी हजेरी लावली.
यावेळी नेत्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की, “महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व दीक्षाभूमी ही बौद्ध समाजाची पवित्र स्थळे असून ती समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.”
मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाने तातडीने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.