Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

Mahabodhi Mahavihar protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी विहार मुक्तीसाठी जन आक्रोश आंदोलन

mosami kewat by mosami kewat
September 19, 2025
in Uncategorized, बातमी
0
Mahabodhi Mahavihar protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी विहार मुक्तीसाठी जन आक्रोश आंदोलन
       

जालना : जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध आंबेडकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दलाच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपला आवाज बुलंद केला.

आंदोलनात मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे दीपक डोके, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर, राजेश सदावर्ते, महेंद्र रत्नपारखे, कुशाल दहीवाल, प्रतिक सम्राट, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने, विष्णु खरात, युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीश रत्नपारखे, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, तालुका सचिव गौतम वाघमारे, कैलास जाधव, विकास जाधव, लक्ष्मण कोळे, सखाराम कोळे, सुरेश कोळे, मुरलीधर बोबडे, गुमनकाका पारखे, दिनकर पाईकराव, सुनील पाईकराव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.

या आंदोलनामुळे जिल्हा मुख्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. अधिकारी वर्गाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून निवेदनाद्वारे पुढे पाठवण्याचे आश्वासन दिले. हे आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे.


       
Tags: buddhismjalnaMahabodhi MahaviharMaharashtraprotestVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

PV Sindhu : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; चीन मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Next Post

Crime : धुळे जिल्ह्यामध्ये १६ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत

Next Post
चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

Crime : धुळे जिल्ह्यामध्ये १६ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून !
अर्थ विषयक

“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून !

by mosami kewat
October 31, 2025
0

संजीव चांदोरकर फक्त सप्टेंबर महिन्यात देशात क्रेडिट कार्ड वापरून २,१७,००० कोटी रुपयांची खरेदी केली गेली. एक ऐतिहासक उच्चांक! ऑक्टोबरचा आकडा...

Read moreDetails
कामगार एकतेचा शतकी प्रवास - आयटकच्या १०५ व्या स्थापना दिनानिमित्त लाल सलाम!

कामगार एकतेचा शतकी प्रवास – आयटकच्या १०५ व्या स्थापना दिनानिमित्त लाल सलाम!

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकरांची अपशब्द वापरून बदनामी; पिंपरी-चिंचवडमध्ये 'वर्धा लाईव्ह' फेसबुक पेजच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाळासाहेब आंबेडकरांची अपशब्द वापरून बदनामी; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘वर्धा लाईव्ह’ फेसबुक पेजच्या ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 31, 2025
अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम

अँटीबायोटिक्सपासून खतांपर्यंत… ड्रग्ससारखीच सवय! — कॉर्पोरेट प्रणालीच्या अल्पकालीन नफ्याचे दीर्घकालीन परिणाम

October 31, 2025
बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी

बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

October 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home