वडोदरा : गुजरातमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. वडोदरा आणि आनंद जिल्ह्यांना जोडणारा, महिसागर नदीवरील ४५ वर्षे जुना पाड्रा-गंभीरा पूल कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत दोन ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह चार वाहने नदीत कोसळली. सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पूल कोसळल्यानंतर एक टँकर पुलावर लटकलेल्या अवस्थेत होता. तर चार वाहने थेट महिसागर नदीत पडली. यावेळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
स्थानिक मुजपूर गावासह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. पाड्रा पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक दशकांपासून जुना झालेल्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार विनंत्या करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. असे आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आम्ही अनेकदा इशारा दिला होता की हा पूल जड वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही आणि त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. स्थानिकांच्या मते, पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते आणि गेल्या काही वर्षांपासून त्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडली आणि त्यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, प्रशासनाचे पथक नदीत कोसळलेली वाहने बाहेर काढण्याचे काम करत आहे.
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडीची प्रभागनिहाय २१ उमेदवारांची यादी जाहीर
नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या २०२५–२०२६ या कार्यकाळासाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर...
Read moreDetails






