Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश!

mosami kewat by mosami kewat
December 23, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश!

मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश!

अकोला : नुकत्याच पार पडलेल्या मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेले अपक्ष नगरसेवक संदीप सरनाईक आणि शुभांगी संदीप सरनाईक यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत जनतेने अपक्ष उमेदवार म्हणून संधी दिलेल्या या दोन्ही नगरसेवकांनी, स्थानिक विकास, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

“बहुजन, वंचित, शोषित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ठाम भूमिका घेणारा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्य प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या पक्षप्रवेश प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवप्रवेशित नगरसेवकांचे स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा पक्षसंघटन व नगरपरिषद कामकाजात निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यामुळे मूर्तिजापूर नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली असून, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष अधिक प्रभावी भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: AkolaElectionMaharashtrapoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindiaनगरपरिषदमूर्तिजापूर
Previous Post

धक्कादायक! आप चुनाव हार रहे हो…; मतमोजणीपूर्वीच उमेदवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज

Next Post

बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या नवनिर्वाचितांचा गौरव; ‘बाळासाहेबां’कडून शुभेच्छा

Next Post
बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या नवनिर्वाचितांचा गौरव; 'बाळासाहेबां'कडून शुभेच्छा

बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या नवनिर्वाचितांचा गौरव; 'बाळासाहेबां'कडून शुभेच्छा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बातमी

नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

by mosami kewat
March 16, 2026
0

नांदेड : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि तपासातील कथित...

Read moreDetails
ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

March 16, 2026
घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

March 16, 2026
अनुसूचित जातींच्या हक्कांवर सरकारचा डाका; ‘एससी’चा १६ हजार कोटींचा निधी पडून

अनुसूचित जातींच्या हक्कांवर सरकारचा डाका; ‘एससी’चा १६ हजार कोटींचा निधी पडून

March 16, 2026
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

March 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home