मुंबई : ज. वि पवार लिखीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म प्रवास आणि भारतीय संविधान’ पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध लेखक ज.वि. पवार लिखीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म प्रवास आणि भारतीय संविधान’ या पुस्तिकेचे प्रकाशन दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष मा. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे झाले. या प्रकाशन प्रसंगी लेखक ज. वि. पवार, डॉ. श्रीधर पवार, सुरेश केदारे, दादा डांगळे, विनोद ढोके, प्रा. राजेश सोनवणे आणि वितरक छनक शिर्के हे उपस्थित होते. बाबासाहेबांचा धम्म प्रवास आणि त्याचा भारतीय संविधानावर उमटलेले प्रतिबिंब हा या पुस्तिकेचा विषय असून बाबासाहेबांची भारतीय संविधान समितीवर झालेली निवड याचा दडपलेला इतिहास स्पष्ट करण्यात आला आहे.
काँग्रेस, बसप, बीआरएसपी कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश
नागपूर : दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे पक्षप्रवेश सोहळा व कार्यकारिणी मुलाखत बैठक उत्साहात पार पडली. या...
Read moreDetails