Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भांडूप मध्ये आधारभिंतींचा प्रश्न एरणीवर, वंचित च्या मुंबई उपाध्यक्ष स्नेहल सोहनी आक्रमक

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 19, 2023
in बातमी
0
भांडूप मध्ये आधारभिंतींचा प्रश्न एरणीवर, वंचित च्या मुंबई उपाध्यक्ष स्नेहल सोहनी आक्रमक
       


भांडूप – भांडूप विभागांत पावसाळी पाहणी दौरा करत असताना नागरिकांनी अनेक समस्या सांगितल्या. त्यात प्रामुख्याने आधार भिंतीचा विषय प्रचंड महत्वाचा असून त्याबाबत वंचितच्या माध्यमातून स्नेहल सोहनी स्वतः काही वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासनाकडून अपेक्षित असलेली हालचाल झाली नाही. स्नेहल सोहनी यांनी प्रशासनास धोकादायक भिंतीचा प्रश्न मांडला असून त्याचा संबंधित BMC अधिकारी व म्हाडा अधिकारी यांना जाब विचारला असता BMC प्रशासन म्हाडाकडे,तर म्हाडा BMC कडे बोट दाखवत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीतही प्रशासन प्रचंड उदासीन असल्याचं दिसत आहे.

आपण पाठपुरावा करत असतानाच भांडुप मधील एक भिंत 28 जून रोजी पडल्याची घटना झाली. त्यावेळी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण प्रशासन जीवित हानी होण्याची वाट बघत आहे का असा सवाल वंचितच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी प्रशासनास केला आहे. BMC प्रशासन आणि म्हाडा एकमेकांची बोट एकमेकांकडे दाखवण्यात व्यस्त आहे. अशा वेळी सामान्य  नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे? प्रशासनाने लवकरात लवकर आधार भिंतीचा विषय निकाली काढला जावा यासाठी जिल्हाधिकारी यांची देखील आपण भेट घेणार असून वेळप्रसंगी वंचित बहुजन आघाडी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.असे मान.महादेव माने सहाय्यक अधिकारी एस वॉर्ड भांडुप यांना निवेदन दिल्यानंतर स्नेहल सोहनी उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश यांनी अशी माहिती माध्यमाला दिली आहे.


       
Tags: Bhandup
Previous Post

ज. वि. पवार यांच्या ग्रंथाचे प्रकाशन व वाढदिवस राजगृहात साजरा

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

Next Post
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भिवंडीत वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा  पक्षप्रवेश; विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश
Uncategorized

भिवंडीत वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा पक्षप्रवेश; विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश

by mosami kewat
November 15, 2025
0

भिवंडी : वंचित बहुजन आघाडी (VBA) भिवंडी शहर शाखेतर्फे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील नागरिक, बहुजन,...

Read moreDetails
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर

November 14, 2025
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

November 14, 2025
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

November 14, 2025
राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

November 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home