बीड: कोरोना महामारीमुळे अवघे जग हैराण आहे. लोकांच्या मनातली भीती कमी करण्याऐवजी अंबाजोगाई आरोग्य प्रशासन ती वाढवीत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेह नेणे आणि एकाच चितेवर अनेक मृतदेह जाळणे हे प्रकार गंभीर असून तुम्ही केलेले अमानवी वर्तन आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिराज बांगर, अनिल डोंगरे यांनी अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयाच्या प्रशासनाला चांगलेच धारेवर घेतले. अशी चूक पुन्हा केली तर आपली गैय केली जाणार नाही. तसेच आपल्या विरोधात जण आंदोलन छेडले जाईल अशी तंबी दिली.
वंचित बहुजन आगाडीच्या पदाधिरी यांनी अंबाजोगाई येथील श्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठता यांची भेट घेऊन एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेह नेणे आणि एकाच चितेवर अनेक मृतदेह जाळणे यावषयी चांगलेच धारेवर घेतले. कोरोनाची भीती कमी करण्याऐवजी वाढविण्याचे काम आपण करत आहात. एवढेच नाही तर धनाढ्य लोकांना बेड आणि गरीब लोकांना जमिनीवर हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मानवता डोळ्यासमोर ठेवून गरीब रुग्णांना आरोग्याच्या सुविधा द्या, त्यांचा छळ करू नका. यावेळी अशी सक्त ताकीत जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर, अनिल डोंगरे, राज्याचे नेते डॉ. नंदकुमार सोमवंशी, युवा नेते प्रा.राजेंद्र मामा कोरडे, अंबाजोगाई शहर अध्यक्ष अमोल हातागळे, पत्रकार प्रसेनजीत आचार्य, गायरान जमीन संघर्ष समितीचे अक्षय भूंबे, नितीन सरवदे, ब्रिजेश इंगळे, विश्वजीत डोंगरे, अनिकेत डोळस यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी दिली.