बांगलादेश – बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सोमवारी (21 जुलै 2025) दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बांगलादेश हवाई दलाचे एक F-7 BGI प्रशिक्षण जेट विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात विमानाचा पायलट शहीद झाला असून, शाळेच्या आवारात विमान कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमान कोसळताच शाळेच्या कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातामुळे कॅम्पसचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही, ज्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, प्रशासनाने याची चौकशी सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच बांगलादेश लष्करी सैन्य, सिव्हिल डिफेन्स पथक आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखालून आणि बाधित झालेल्या परिसरातून मदतकार्य वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे ढाका शहरात शोककळा पसरली आहे.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails