ॲड. प्रकाश आंबेडकर : गेल्या 10 वर्षात 84 हजार शेतकरी,शेतमजूर यांच्या आत्महत्या
अंबाजोगाई : गेल्या १० वर्षात देशातील ८४ हजार शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या याची बातमी कुठेही आली नाही. यापैकी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना मोदीने किती मदत दिली याची माहिती द्यावी असेॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला. ते वंचित बहुजन आघाडी बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत आयोजित परिवर्तन सभेत बोलत होते. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, उमेदवार अशोक हिंगे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान यांचं कार्यालय हे मानवतेच कार्यलाय असताना हे वसुलीचे कार्यलाय झालं, राजकारणात नीतिमत्ता ची फार मोठी किंमत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणात कुठेही नीतिमत्ता दिसत नाही असं म्हणत महायुतीवर निशाण साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची बांधिलकी नाही, ज्याला नीतिमत्ता नाही तो त्याच्या फायद्यासाठी काम करणार असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला.

मोदी असं म्हणतात माझ्या कालावधीत काहीच करप्शन झालं नाही काँग्रेसवल्यानी लिस्ट काढली त्या लिस्ट मध्ये किती ठिकाणी कारप्शन झालं याची लिस्ट काँग्रेसवाल्यानी दिली ती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेसमोर वाचून दाखवली. महागाई बरोबर बेरोजगारी वाढली, मोदींमुळे सगळं देशोधडीला लागले, हे चोरांचे, व्यापाराचे, लुटारांचे सरकार आहे.इथले शासन राज्य करण्यासाठी नाही तर तोडमोड करण्यासाठी आहे .मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण साठी राजकीय भूमिका घेणं अवघड झालं. इथल्या गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे. शरद पवारांना देखील मी भूमिका घेण्यासाठी सांगितले होते. असे ॲड.आंबेडकर म्हणाले.
अंबाजोगाई येथील सभेला उपस्थित मान्यवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर,बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शैलेश कांबळे, मिलिंद घाडगे, पंजाबराव डक, विष्णु जाधव, डॉ.धर्मराज चव्हाण, महेश निनाळे, तय्यब खान, बिभीषण चाटे, खाजामिया पठान, बाबुराव मस्के, विष्णु देवकाते, वैभव स्वामी, डॉ.नितिन सोनवणे, प्रा. छाया हिरवे, ॲड.अनिता चक्रे, पुष्पाताई तुरूकमारे, यूनुस शेख, पुरुषोत्तम वीर, सुरेश पोतदार, धम्मनंद साळवे, सचिन उजगरे, अंकुश जाधव, रानबा उजगरे, बालाजी जगतकर,अजय सरवदे, बालासाहेब जगतकर, गौतम आगळे, प्रसन्नजित रोडे, चंद्रकांत खरात, रोहन मगर, पुर्वचे जिल्हा तालुका आणि शहर, समता सैनिक भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अशोक हिंगे विकासाचे राजकारण करणार –
उमेदवार अशोक हिंगे पाटील जातीपातीचे नाहीतर विकासाचे राजकारण करणार, महाविकास आघाडी व महायुती हे दोघे एकच आहेत, त्यांना धडा शिकवण्यासाठी मला ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी बीड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मराठा आरक्षण तसेच मुस्लिम, धनगर,आरक्षण प्रश्नावर आपण अगोदरही भूमिका घेतली आहे.आत्ता ही घेली आहे. आणि यापुढेही भूमिका घेऊन मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे मला लोकसभेत पाठवा, प्रस्थापित राजकीय धडा शिकवा असे हिंगे यांनी सांगितले.