Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
February 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       

नागपूर : नगर पंचायत बहादुरा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरगुती कचऱ्याचे संकलन दररोज होत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी आणि वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.  कचरा संकलनात तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

भारत सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार, घराघरातून दररोज कचरा संकलन करणे नगर पंचायतीवर कायदेशीर बंधनकारक आहे. मात्र, बहादुरा नगर पंचायत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘कागदावर स्वच्छता आणि जमिनीवर घाण’ अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. ( Nagpur news)

दररोज कचरा उचलला जात नसतानाही जर कंत्राटदाराला पूर्ण देयके अदा केली जात असतील, तर हा थेट भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि बेजबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष यश कुंभारे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, हा केवळ स्वच्छतेचा विषय नसून नागरिकांच्या मूलभूत आरोग्य अधिकारांचा प्रश्न आहे. जर प्रशासनाने तात्काळ दररोज कचरा संकलन सुरू केले नाही, तर नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. ( Nagpur news)

यावेळी बहादुरा शहर अध्यक्ष कुणाल सुखदेवे, महासचिव प्रफुल माटे, संघटक छत्रपाल तामगाडगे, उपाध्यक्ष समीर वानखेडे, राकेश पाटील, प्रफुल पवार, अजय ठाकरे, हरेंद्र जांगळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: ClearGarbageHealthMaharashtranagpurPoliticalVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

Next Post

वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !

Next Post
वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !

वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home