PV Sindhu In China Masters QF : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात तिने थायलंडच्या अव्वल खेळाडू पोर्नपावी चोचुवोंगचा 21-15, 21-15 असा सहज पराभव केला. हा विजय सिंधूसाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण यामुळे तिला चोचुवोंगविरुद्धच्या लढतींमध्ये 6-5 अशी आघाडी मिळाली आहे.
या विजयानंतर सिंधूने आनंद व्यक्त करत सांगितले की, तिने सुरुवातीपासूनच पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. “माझ्यासाठी प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा होता. मी पूर्ण क्षमतेने खेळले आणि त्याचा मला खूप फायदा झाला,” असे ती म्हणाली. आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना कोरियाच्या अव्वल मानांकित एन से यंग आणि डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड यांच्यातील विजेत्याशी होईल.
भारताच्या पुरुष दुहेरीतील स्टार जोडी
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी चायनीज तैपेईच्या जोडीचा 21-13, 21-12 अशा सोप्या फरकाने पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.