औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रभाग क्रमांक ११ मध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुब खान यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असला तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद द्विगुणित झाली आहे. या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
इब्राहिम पटेल हे प्रभाग ११ मधील एक अनुभवी आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व मानले जातात. त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन थेट वंचितच्या उमेदवाराला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुब खान यांना आता इब्राहिम पटेल यांच्या रूपाने मोठ्या गटाचा पाठिंबा मिळाला आहे. पटेल यांच्या समर्थकांनी आता आयुब खान यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. या पाठिंब्यामुळे प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे पारडे जड झाले असून विरोधकांची इथेच हार झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे
या आधी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ९ प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली माघार जाहीर केली होती, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश दामू पटेकर यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आता हा दुसऱ्यांदा प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या समोर आपली माघार घेत वंचितलाच पाठींबा दिला आहे.





