औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात हा ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आले आहे. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित आहेत, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
युवा जिल्हाध्यक्षांकडून उपस्थितांना शपथ
मोर्चादरम्यान, युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी उपस्थितांना शपथ दिली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.






