औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभाग क्र. २४ येथे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, यांच्या वतीने संजयनगर मुकुंदवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वंचित बहुजन आघाडी कार्यालय येथे भव्य ‘महा आरोग्य शिबीर’ व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या आरोग्य शिबिरात सहभागी नागरिकांसाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आरोग्य शिबिरासोबतच भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याला रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
शासकीय रुग्णालय घाटी यांच्या सहकार्याने शिबिरात नेत्र तपासणी करण्यात आली आणि गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध करण्यात आली.

या शिबिरामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचारांचा लाभ घेता आला.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी:
सेठ नंदलाल धूत आणि मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली आणि मोफत औषधींचे वाटप केले.
सामान्य तपासणी : रक्तदाव, नाही, श्वसन गती, तापमान, उंची आणि वजन, BMI, शरीरातील सूज, पिवळेपणा, थकवा इ. लक्षणे
नर्व्हस सिस्टम : डोकेदुखी, चक्कर, थरथर, झोपेचे विकार मेंदूशी संबंधित मूलभूत तपासणी न्यूरोलॉजिस्टकडे रिफर करणे (गरज असल्यास)
हृदय आणि रक्ताभिसरण तपासणी : हृदयाचे ठोके ऐकणे, अनियनित ठोके, छातीत दुखणे, दम लागणे, बलड प्रेशर, कंट्रोल तपासणे, मधुमेह तपासणी व EGC
श्वसन प्रणाली : फुफ्फुस ऐकणे, खोकला सर्दी, श्वास घेण्यास त्रास, अस्थमा, ब्राँकायटिस





