Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 27, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, संपादकीय
0
बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       
आरोपींना तात्काळ अटक करा, जातीय रंग देऊन नका – वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांचे आवाहन!

बीड – बीड शहरातील एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ दरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, प्रशांत खाटोकर व विजय पवार या दोघांनी पीडितेला वारंवार वर्गानंतर केबिनमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचे आरोप आहेत. तसेच, तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे पीडितेला तीव्र मानसिक धक्का बसला असून, तिने ही माहिती पालकांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी POCSO कायदा आणि भारतीय दंडविधानातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत, ही चिंतेची बाब आहे. दरम्यान, विजय पवार हे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींशी जवळचे संबंध ठेवणारे, तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक संपत्ती उभी केल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय व आर्थिक दबावामुळे चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाकडे मी मागण्या करण्यात येत आहेत. दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी प्रकरणाची जलद, निष्पक्ष चौकशी करावी. पीडितेला मानसिक, वैद्यकीय व कायदेशीर मदत द्यावी. या प्रकरणाला जातीय वा सामाजिक रंग देण्याचे प्रयत्न रोखावेत, कोचिंग क्लासेसवर सुरक्षा नियमावली लागू करून अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे याप्रकरणी तात्काळ, ठोस व निष्पक्ष कारवाईची मागणी होत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम वीर, सहसंघटक अर्जुन जंवजाळ, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, बीड शहर अध्यक्ष लखन जोगदंड, मिलिंद सरपते, प्रकाश उजगरे, प्रदीप खळगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

“प्रभाग रचना राजकीय फायद्यासाठी नको – वंचित बहुजन आघाडीचा आयुक्तांना इशारा”

Next Post

“अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी”

Next Post
"अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी"

बातमी

“अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी”

अकोला: अकोला जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन अधीक्षक पदावर नियमानुसार रिक्त होण्याआधीच झालेल्या नियुक्तीबाबत वंचित बहुजन युवा आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवत ...

June 27, 2025
बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?
बातमी

बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

आरोपींना तात्काळ अटक करा, जातीय रंग देऊन नका - वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांचे आवाहन! बीड - बीड शहरातील एका ...

June 27, 2025
"प्रभाग रचना करताना राजकीय दबाव टाळा; वंचित बहुजन आघाडीचा नाशिक महापालिकेला इशारा"
Uncategorized

“प्रभाग रचना राजकीय फायद्यासाठी नको – वंचित बहुजन आघाडीचा आयुक्तांना इशारा”

नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी जोरदार मागणी वंचित ...

June 27, 2025
पिंपरी चिंचवडमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती उत्सवपूर्वक साजरी; वंचित बहुजन आघाडीतर्फे पुतळ्यास अभिवादन
बातमी

पिंपरी चिंचवडमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती उत्सवपूर्वक साजरी; वंचित बहुजन आघाडीतर्फे पुतळ्यास अभिवादन

पिंपरी चिंचवड (शाहूनगर, चिंचवड) | वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आरक्षणाचे जनक आणि समाजसुधारक राजश्री शाहू महाराज ...

June 27, 2025
Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराज जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालयात उत्साहात साजरी; प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन
बातमी

छत्रपती शाहू महाराज जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालयात उत्साहात साजरी; प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वंचित ...

June 26, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क