औरंगाबाद- अंधाराचा फायदा घेऊन ABVP या देशद्रोही आणि देशविघातक संघटनेने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बॉटणी विभागाच्या शेजारी असलेल्या “महात्मा फुले, डॉ आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या” नामफलकावर ‘स्प्रे कलर’ ने Join ABVP असा उल्लेख करून सामाजिक समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला असता. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देऊन ABVP नवदहशतवादी, देशद्रोही, देशविघातक संघटनेच्या विरोधात गुन्हा दाखल करून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कमेटी ने केली.
यावेळी विद्यापीठ अध्यक्ष संदीप तुपसमिंद्रे, जिल्हा महासचिव नारायण खरात, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव वाघमारे, सिद्धार्थ मोरे, जयपाल सुकाळे, भागवत चोपडे, रामेश्वर मुळे, बळिराम चव्हाण यांच्यासह सम्यक चे विद्यापीठ परीसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर...
Read moreDetails






