– दिवंगत मधुकर बालाजी मर्चंडे
आज आंबेडकरी नावाने असंख्य संस्था उभ्या आहेत…पण प्रश्न आहे आपण एकत्र आहोत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते—“संघटित व्हा!”पण आज काय दिसतं? गट वेगळे, झेंडे वेगळे, नेते वेगळे आणि…विचार तुकड्यांमध्ये विभागलेले! हीच गटबाजी आपली सर्वात मोठी कमजोरी आहे! निवडणुकीत मतं विभागतात, आवाज कमकुवत होतो…आणि इथेच इतर जातीयवादी शक्ती आपल्यावर वरचढ होतात!
म्हणूनच सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम केलेले नेते दिवंगत मधुकर मर्चंडे यांचं हे निरीक्षण आहे की आंबेडकरी चळवळीला मारक आहेत बौद्धांच्या अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था…. आणि यावर आपण या लेखातून विस्तृत मांडणी करणार आहोत….. आज आपल्या आंबेडकरी चळवळीच अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी ही फक्त बौद्धांची आहे… कारण इतर SC, OBC, ST, NT असे समाज फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या सोयी सुविधा आयत्या घेतात पण चळवळीत कधी दिसत नाहीत…. मग ही जबाबदारी येऊन पडते ती फक्त बौद्धांवरती… परंतु बौद्धांच्या घरी पण आता प्रत्येक जण स्वतःला विद्वान समजू लागला आहे आणि इथेच सगळा घोळ होतो… आज वाडी पासून जरी विचार केला तरी वाडीत पण दोन ते 3 गट पहायला मिळतात हे खरंच घातक आहे आंबेडकरी चळवळीला… म्हणून दिवंगत मधुकर मर्चंडे म्हणायचे Ambedkrizem is not a jock कारण बौद्धांच्या या असंख्य संघटना, संस्था, राजकीय पक्ष यांनी थट्टा लावली आहे चळवळीची…. तरी आपण मुद्देसूद पाहुयात काय परिणाम होतो या सगळ्याचा…
असंख्य संस्था पण समस्या दिशाहीन असल्याने आज आंबेडकरी विचारांच्या अनेक संस्था, संघटना आहेत. अनेक संघटना असल्यामुळे प्रत्येक संघटना स्वतःला श्रेष्ठ आणि केंद्र मानते . एकमेकांशी समन्वय नसतो. एकत्रित धोरण तयार होत नाही आणि काय मिळवायचं आहे, समाजाच हित काय, समाज मोठा कसा होईल? या दिशेला जाण्याचा मार्ग नसल्याने समस्या आहे. म्हणजे कोणीतरी विचारत आंबेडकरी चळवळीतील एकाला की तुम्ही या बुद्धिबळाच्या पटावरचे कोण? तर आम्ही स्वतःला राजा म्हणायचं सोडतो आणि स्वतःला प्यादा घोषित करतो. इथेच चळवळ कमकुवत होऊन जाते.. म्हणून मी म्हणतो; अरे नाही तू त्या पटावरचा प्यादा तु आहेस सत्तेतला दादा नको ABCD नको अ ब क ड जिंकायचा आहे आपल्याला तो दिल्लीचा गड
गटबाजी सर्वात मोठा आतला शत्रू –
आज आंबेडकरी चळवळीला बाहेरच्या शत्रू पेक्षा मारक आहे ती आपल्यातली गटबाजी . हा आमचा गट तो त्यांचा गट , असे करत करत आपण एकाच विचाराचे 100 तुकडे करतो. जेव्हा आपण आपल्यातच एकमेकांसमोर उभे ठाकतो तेव्हा शत्रूला काहीच करावं लागत नाही आपण स्वतःच स्वतःला हरवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका 2026 एकही आंबेडकरी पक्षाला आपले उमेदवार निवडून आणता आले नाही हे दुर्दैव……
मतांची विभागणी आणि सर्वात मोठं राजकीय नुकसान –
हि गटबाजी फक्त भावना तोडत नाही तर ती “आपली राजकीय ताकद ही कमी करते ” आपण एकमेकांच्या विरोधात आपलेच उमेदवार देतो किंवा आपल्या समाजाची वोट बँक इतर राजकीय पक्षाकडे गहाण ठेवतो आणि मोबदला मिळवून राजकीय टेंबा मिरवतो. यामुळे आपल राजकीय अस्तित्व धोक्यात येतं आपली राजकीय ताकद कमी होते… बाबासाहेब मोक्याच्या जागी जा, इथली शासनकर्ती जमात बना असा संदेश देत होते तो काय? तुम्ही प्रशासकीय बना प्रशासक बना पण आपण पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही आपल्याच वेगवेगळ्या राजकीय पक्षातून समोरासमोर उमेदवार देतो तर काही समाजालाच दावणीला बांधतात इतर पक्षांकडे…. तुम्ही समोरासमोर लढण्यापेक्षा एकत्र लढले पाहिजे…. हीच वेळ असते. जेव्हा इतर जातीयवादी शक्ती आपल्या विभागणीचा फायदा घेतात.
बाहेरच्यांची रणनीती – divide and rule
इतिहास सांगतो फूट पाडा आणि राज्य करा… बहुजनाचं पोरगं, बौद्धांच पोरगं कुठं आंबेडकरी विचार मांडू लागलं, मान वर काढू लागलं की काही कार्यसम्राट त्यांना अलगद बाजूला घेऊन आपल्या बाजूला शांत बसवलं जातं….. आजही काही शक्ती असच करत आहेत. दुसर म्हणजे एका गटाला दुसऱ्या गटाविरुद्ध उभ करतात. मतभेदाना भांडणात रूपांतर करतात आणि स्वतः मजबूत होतात. आणि मला वाटतंय आपण अशा लोकांचं काम अगदी सोप्प करतो आहोत….
व्यक्तिपूजा आणि अहंकार
काही संस्थांमध्ये आज बाबासाहेबांपेक्षा त्यांच्या विचारापेक्षा व्यक्ती मोठी होते. आणि नेत्यावर प्रश्न विचारला की वाद होतो , टीका केली की “विरोधक” ठरवलं जातं ही प्रवृत्ती चळवळीला कमजोर करते. कारण विचार जिवंत राहिले तर चळवळ जिवंत राहते. कोण्या संघटनेच्या व्यक्तीवर आधारित चळवळ लवकर तुटते..
समन्वयाचा अभाव – हरवलेली ताकद
जर या सर्व संस्था एकत्र आल्या असत्या,तर त्यांची ताकद किती मोठी असती!पण आज; वेगळे कार्यक्रम, वेगळे अजेंडा, वेगळे निर्णय, एकत्रित आवाज नाही आणि म्हणूनच आपला प्रभाव कमी पडतो. उपाय – चळवळ वाचवायची असेल तर मित्रांनो, आता वेळ आली आहे— संस्था असू द्या, पण एक दिशा ठेवा, मतभेद असू द्या, पण मनभेद नकोत, नेतृत्व करा, पण अहंकार टाळा आणि सर्वात महत्त्वाचं— एकजूट निर्माण करा!
मित्रांनो,चळवळ हरवते ती बाहेरच्या शत्रू मुळे नाही—ती हरवते आतल्या फुटीमुळे.जर आपण एकत्र आलो, तर कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही.पण जर आपण तुटलो तर कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही. चला, गटांमध्ये नाही—विचारांमध्ये एक होऊया!





