नाशिक – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १८ जानेवारी १९२८ रोजी त्र्यंबकेश्वर येथे ऐतिहासिक भेट देऊन समाज प्रबोधन केले होते.या ऐतिहासिक घटनेचा येणाऱ्या पिढीला ज्ञान व्हावे याकरिता नगर परिषद रितसर परवानगी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर ,पोलीस अधिकारी,नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १८ जानेवारी २०२० रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां स्मारकामध्ये ऐतिहासिक कोनाशीला लावण्यात आली होती.भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते लावलेली ऐतिहासिक कोनशीला आहे.मात्र १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी १२ एप्रिल रोजी स्मारकावरील कोनशीला काढून नेली आहे.हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाचे कलम कलम 3 (1) (टी) तसेच 3 (1) (व्ही) नुसार पवित्र वस्तू नष्ट करणे, नासधूस करणे किंवा खराब करणे तसेच आदरणीय अश्या मृत व्यक्तीचा किंवा थोर महापुरुष ह्यांचा अपमान किंवा अनादर करणे ह्या बाबतचा गुन्हा करण्यात आला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे ऐतिहासिक कोनशिलाची विटंबना करीत त्याची नासधुस करुन ती गायब करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी गंगाथरण डी नाशिक व पोलीस अधीक्षक शहाजी उमप ह्यांना प्रदेश युवा आघाडी ने खणखणीत पत्र पाठवून या गुन्ह्याचा वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.ज्या कोणीही ऐतिहासिक कोनाशीलाची विटंबना करुन महापुरुषाचा अपमान केला अश्या व्यक्तीवर पोलीस विभागाने तात्काळ गुन्हे दाखल करून योग्य ती कठोर कारवाई करणे आवश्यक होते.मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.भिमजयंती च्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि राज्यात ह्या घटनेचे चुकीचे संदेश जात आहेत.
सदर घटने बाबत दि.१२एप्रिल २०२३ रोजी त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली आहे.परंतु कार्यवाही झाली नसल्याने त्या संदर्भात आज नगर परिषदेमध्ये निवेदन दुपारी १२ वाजता निवेदन दिले जाणार असल्याचे कळविले आहे.नगर परिषद कडून ही कोनशीला काढण्यात आल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.सबब पूर्व परवानगी देऊन लावलेली कोनशीला काढून नगर परिषद च्या संबंधित अधिकारी कर्मचारी ह्यांनी भिम जयंती च्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ आणि तणाव निर्माण करणारे कृत्य केले आहे. त्यामुळे ह्यात लिप्त दोषी विरुद्ध अट्रोसिटी कायदाचे कलम कलम 3 (1) (टी) तसेच 3 (1) (व्ही) नुसार तसेच जातीय तणाव निर्माण करण्याचे गुन्हे दाखल करून तातडीने अटक व्हावी आणि सदर कोनशीला सन्मानपूर्वक स्मारक स्थळी बसविण्यात यावी अशी मागणी करीत
तातडीने दखल घेण्याची अपेक्षा राजेंद्र पातोडे वंचित बहूजन युवा आघाडी,महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने केली आहे.