रायगड – राज्यात चाललेल्या सत्ता संघर्षात जनतेच्या विकासाचा मूलभूत विचार बाजूला सारून राज्यकर्ते स्वतःचा फायदा करून घेण्यात मश्गूल असताना वंचित बहुजन आघाडी सारखा स्वाभिमानी बाणा असलेला पक्ष जनतेच्या पसंतीस उतरत आहे. अलिबाग तालुक्यामध्ये दि.०३-०९-२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घघाटन व नामफलक अनावरण कार्यक्रम नुकताच पार पडला असून तालुक्यातील पेझारी, महाजने गावात शाखा स्थापने सह नाम फलकाचे अनावरण वंचित बहुजन आघाडी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओव्हाळ , जिल्हा महासचिव वैभव केदारी यांच्या हस्ते केले असल्याचे तालुका अध्यक्ष निलेशकुमार घरत, तालुका उपाध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी माहिती दिली.वंचित बहुजन आघडीचे सर्वेसर्वा ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर, जिल्हा निरीक्षक प्रियदर्शी तेलंग यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून तालुक्यात मरगळलेळी वंचित पुन्हा सतेज करत गांव तेथे शाखा स्थापन करून पुढील आगामी होणाऱ्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रदीप ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुका अध्यक्ष निलेशकुमार घरत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापनेसह गावात नामफलक अनावरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.अलिबाग तालुक्याच्या वंचितच्या इतिहासात पहिल्या टप्यात प्रथमच तालुक्यात मोठया प्रमाणात गाव तेथे शाखा उघडली जात आहे. त्यामुळे आता अलिबाग तालुक्यामध्ये वंचितला राजकीय संजीवनी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शाखा उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा संघटक सागर गायकवाड,जिल्हा सदस्य बाबासाहेब अडसूळे अलिबाग तालुका अध्यक्ष निलेशकुमार घरत, ता उपाध्यक्ष साईनाथ म्हात्रे, ता उपाध्यक्ष हमीद बुखारी, ता उपाध्यक्ष जयराम पारांगे, कोषाध्यक्ष राम म्हात्रे, संघटक शैलेश पवार व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच नवीन शाखा अध्यक्ष पेझारी शाखा अध्यक्ष्य सुबोध ठाकूर, उपाध्यक्ष विराज पाटील, उपाध्यक्ष मुकेश ओव्हाळ, महिला अध्यक्षा सोनाली ठाकूर, उपाध्यक्षा भाग्यश्री ओव्हाळ व शाखा पदाधिकरी, महाजने शाखा अध्यक्ष हर्षद पारंगे उपाध्यक्ष विजय पाटील, महाजने विभाग अध्यक्ष उल्हास जाधव व पदाधिकारी स्थानिक महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.