अकोला : अकोला शहरातील प्रभाग 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर प्रमुख पाहुण्याच्या रूपात उपस्थित होत्या.
सभा दरम्यान प्रा. आंबेडकर यांनी अकोला शहरवासीयांना थेट आवाहन केले की, शहरातील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, गटार व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आता एकच संधी आहे, वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन उमेदवारांना मतदान करावे आणि विजयी करावे.
प्रभाग 4 मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार:
किर्तक नितेश मुकिंदा – अ
आशा सुरेश गावंडे – ब
सरला अशोक मेश्राम – क
सरला अशोक मेश्राम – ड
प्रचार सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि प्रा. आंबेडकरांच्या संदेशावर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रचार मोहीमेचा उद्देश फक्त निवडणूक विजय नसून, अकोला शहराची गुणवत्ता वाढवणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.






