अकोला : तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याला आज अकोल्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात राज्यभरातून हजारो अनुयायी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत आहेत.
या धम्म मेळाव्यात विविध प्रकारच्या साहित्यांचे, विशेषतः बौद्ध साहित्य आणि सामाजिक विषयावरील पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे. यामध्ये ‘प्रबुद्ध भारत’ या पुस्तक विक्री स्टॉलने विशेष लक्ष वेधले आहे.
‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी स्टॉलला भेट देऊन पुस्तकांचे निरीक्षण केले आणि आयोजकांचे कौतुक केले.
धम्म मेळाव्यातील ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलसह इतर अनेक स्टॉल्सवर बौद्ध संस्कृती, इतिहास, तत्त्वज्ञान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित साहित्य सहज उपलब्ध असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या साहित्याची खरेदी केली आहे.