अकोला : शहरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम बाजूला असलेल्या भंगार बाजाराला सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडलीय. आगीची कारण अद्याप समजू शकले नसले तरी या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन केली. यावेळी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन व्यापाऱ्यांना सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी महानगर कार्याध्यक्ष मजहर खान, चांद खान, महासचिव गजानन गवई, शब्बीर चव्हान, सय्यद अलीमुद्दिन खान, जुनेद खान मंजर, युनूस खान, अन्सार खान, हसीब खान, शेख करीम यांच्यासह इतर भंगार व्यापारी उपस्थित होते.
मुंबईत ‘उबाठा’ आणि मनसे युतीमुळे शिवसेनेचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर
कोल्हापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य...
Read moreDetails






