आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वाढत्या वापरामुळे अनेक नोकऱ्या संकटात सापडल्या असून, मायक्रोसॉफ्टच्या अलीकडील अहवालानुसार तब्बल ४० प्रकारच्या नोकऱ्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः डेटा एन्ट्री, ग्राहक सेवा, टायपिंग, ट्रान्स्क्रिप्शन, बेसिक अॅनालिसिस अशा नोकऱ्यांमध्ये AI सहज काम करू शकते, त्यामुळे यातील कर्मचाऱ्यांना मोठा धोका आहे.
तथापि, सर्जनशीलता, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि भावनिक बुद्धिमत्तेची मागणी असलेल्या नोकऱ्या जसे की शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञ, संशोधक, नेते, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यावसायिक या AI च्या पलीकडे असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना सध्या तरी फारसे भय नाही, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
AI ही संधी आणि आव्हान दोन्ही आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नव्या कौशल्यांचे शिक्षण घेणे, डिजिटल साक्षरता वाढवणे आणि ‘ह्यूमन टच’ असलेल्या क्षेत्रांकडे वळणे, ही काळाची गरज बनली आहे.