अहमदनगर: अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Sangram Jagtap controversial statement)
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अहमदपूर तालुका अध्यक्ष सत्तार हबीबसाब शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले की, आमदार संग्राम जगताप यांनी भाषणादरम्यान आणि बोलताना मुस्लिम समाजाबद्दल ‘लांडे’ असे अपशब्द वापरले आहेत. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
या घटनेमुळे महाराष्ट्राचे वातावरण बिघडून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. सत्तार शेख यांनी विनंती केली आहे की, आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी करावे. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. (Sangram Jagtap controversial statement)
अन्यथा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको करण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails