Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देतील : सोट कुटुंबीय

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2025
in बातमी
0
बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देतील : सोट कुटुंबीय
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली भेट

लातूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथील ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या माऊली सोट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तसेच माऊलीला न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी सोट कुटुंबियांना दिले.

भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, माऊली सोट यांचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाला आहे. त्यांचे पॅथलोजिकल फॉरेन्सिक उपयोगाचे नव्हते, तर क्लिनिकल फॉरेन्सिक करणे गरजेचे होते. हाडाला, नसांना किंवा अन्य शरीराच्या अवयवांना मार लागलाय का याबाबत क्लिनिकल फॉरेन्सिक मधून समजते. पोलीस अधीक्षकांना मी विनंती केली आहे की, आता माऊली यांचा अंत्यविधी झाला आहे. पण पोस्टमार्टम फोटोग्राफ वरून क्लिनिकल फॉरेन्सिक करता आले तर पहावे.महाराष्ट्रात हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये जी ऑनर किलिंगची पध्दत आहे ती आली आहे. याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध करावा अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी करत असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

लातूर पोलीस अधीक्षकांना टेलिफोनवर सुद्धा बोललो आणि आज प्रत्यक्षात भेटलो. त्यांनी सुद्धा सोट यांची हत्या ऑनर किलिंग आहे हे मान्य केले. कायदेशीर आपल्याला जे करायचं आहे ते करायला सुरुवात झाली असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

आज आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे सांगितले. त्यामुळे बाळासाहेबचं आम्हाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास सोट कुटुंबियांनी व्यक्त केला.


       
Tags: Devendra FadanvislaturMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शालेय मंत्र्यांना सवाल अन् जातीच्या उल्लेखाचा निर्णय रद्द !

Next Post

सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना नवीन हॉल तिकीट देण्याची विनंती

Next Post
सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना नवीन हॉल तिकीट देण्याची विनंती

सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना नवीन हॉल तिकीट देण्याची विनंती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
बातमी

‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

by mosami kewat
July 22, 2025
0

‎मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read moreDetails
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

July 22, 2025
नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

July 22, 2025
'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

July 22, 2025
प्रवाशांसाठी खुशखबर! आता 'भारत गौरव यात्रा' रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

July 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home