ख्रिस्ती समाजाच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज भारताचे प्रमुख ख्रिश्चन धर्मगुरु कार्डिनल ग्रेशियस ओसवाल्ड यांची इस्टर सणानिमित्त सदिच्छा भेट घेतली. ख्रिस्ती समाजाच्या व्यथा, सामाजिक, धार्मिक हक्क व होणारे अन्याय, गरजा याबाबत विस्तृत चर्चा झाली. या वेळी ख्रिश्चन समाजाचे तरुण नेते लुकस उर्फ प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे, सँमसन फेबियन, ॲड. अंतोन कदम, रतन ब्राम्हणे उपस्थित होते.
ही भेट इस्टरनिमित्त आयोजित करण्यात आली होती. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना पवित्र बायबल आणि कार्डीनल यांनी संस्थेचे मोमेन्टो भेट देण्यात आले. या वेळी कार्डीनल ओसवाल्ड ग्रेशियस, लुकस केदारी यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार केला. ओसवाल्ड यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सदिच्छा दिल्या.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन खान, मुख्य प्रवक्ते तथा उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे उपस्थित होते.