सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी न्यायासाठी पाठपुरावा
परभणी येथे मागील महिन्यात संविधानाच्या विटंबनेच्या मुद्द्यावरून मोठा असंतोष निर्माण झाला. समस्त आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी निषेध नोंदवला. या घटनेत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या उच्चशिक्षित युवकाचा मृत्यू झाला. सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी सोडता कोणीही ठामपणे पुढे आल्याचे दिसले नाही.
ॲड. आंबेडकर यांनी केलेला पाठपुरावा-
– सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्या फॉरेन्सिक पोस्टमार्टमची मागणी आंबेडकरांनी केली.
– या प्रकरणी सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकरवादी वकिलांच्या टीमला मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत करण्याचे काम ॲड. आंबेडकर करत आहेत.
– सूर्यवंशी यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या अँब्युलन्सला लातूर या ठिकाणी अडवण्यात आले, तेव्हा पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांना संपर्क करून या बाबत जाब विचारून, अँब्युलन्स परभणीच्या दिशेने बोलावली.
– सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीत कोणतीही बाधा येऊ नये, तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ॲड. आंबेडकर हे सुरुवातीपासून ते अंत्यविधी पार पडेपर्यंत अंत्ययात्रेत सहभागी होते.
– सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटीचे आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून तशी मागणी ॲड. आंबेडकरांनी केली.
– तसेच या भेटीत त्यांनी या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.
– सूर्यवंशी कुटुंबीयांनी सुद्धा ॲड. आंबेडकर यांची अकोल्यातील यशवंत भवन या निवासस्थानी भेट घेतली आणि ॲड. आंबेडकरच आम्हाला न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला.
– सरकारकडून अपेक्षित मदत सूर्यवंशी कुटुंबियांना मिळाली नाही, सरकार देत असलेली मदत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने नाकारली. वंचित बहुजन आघाडीकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात आले. तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
अद्यापही ॲड. आंबेडकर या प्रकरणी लक्ष देऊन आहेत. आम्ही सूर्यवंशी यांना न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले होते. ॲड. आंबेडकर यांच्याकडून केला जात असलेला पाठपुरावा पाहता तेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतात असा विश्वास आंबेडकरी जनता आणि सूर्यवंशी कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.