Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा ‘जबाब दो’ मोर्चा

mosami kewat by mosami kewat
August 13, 2025
in बातमी
0
आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा 'जबाब दो' मोर्चा

आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा 'जबाब दो' मोर्चा

       

जळगाव : धुळे जिल्ह्यातील मोरदड येथील आदिवासी तरुण जगदीश ठाकरे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या वतीने आज चाळीसगाव येथे ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला.
‎
‎जगदीश ठाकरे यांची हत्या राजकीय षडयंत्रातून झाल्याचा आरोप करत, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोविंद शिवाजी पाटील याला तात्काळ अटक करण्याची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली.
‎
‎मोर्चादरम्यान एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव यांनी उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले की, 29 जून 2025 रोजी जगदीश ठाकरे यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेला दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी गोविंद शिवाजी पाटील अजूनही मोकळा फिरत आहे. गोविंद पाटील हा धुळ्याचे आमदार आणि मालेगावचे मंत्री दादा भुसे यांच्या जवळचा नातेवाईक असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
‎
‎या मोर्चातील प्रमुख मागण्या:

– आदिवासी तरुण जगदीश ठाकरे याची निर्घुण हत्या प्रकरणी आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या आदिवासी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.

– जगदीश ठाकरे खून प्रकरणात मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील हा, स्थानिक आमदार व मंत्र्याचा नातेवाईक असल्याकारणाने पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे हा तपास सीआयडी कडे सोपवावा.

– जगदीश ठाकरे यांची हत्या घडवून आणणारा मुख्य सूत्रधार आरोपीवर भा.न्या. सं. 2023,IPC कलम 109 (ब) हे वाढीव दाखल करून त्याला त्वरित अटक करावी.

– जगदीश ठाकरे हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता पुरुष असल्याकारणाने सरकारने त्याला 1 कोटीची आर्थिक मदत करून त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी.

– पिंपरखेड तांडा तालुका चाळीसगाव या ठिकाणी आदिवासी समाजाची सुमारे 39 कुटुंबे नदी क्षेत्रामध्ये राहतात.या कुटुंबांचे पुनर्वसन त्वरित करावे.
‎
‎या मागण्या मान्य न झाल्यास, वंचित बहुजन आघाडी आणि आदिवासी संघटनांच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनिलराव जाधव यांनी दिला आहे. या मोर्चात अनेक आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, आदिवासी विकास मंत्री, एससी, एसटी आयोग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.


       
Tags: crimemurderpoliceprotestvbaforindiaजळगाव
Previous Post

मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

Next Post

संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post
संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप
बातमी

हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

by mosami kewat
April 3, 2026
0

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजु कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथे धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली...

Read moreDetails
६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी 'वंचित' सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी ‘वंचित’ सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

April 3, 2026
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 3, 2026
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home