पुणे : भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त लाखों भीम सैनिक शुरवीरांना मान वंदना देण्यासाठी येत असतात. याच निमित्ताने वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, राज्य सल्लागार महेश भारतीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर तसेच सभासद नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 138 बाटल्या रक्तदान झाले.
सभासद नोंदणी वेळी सम्यकच्या वतीने आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी केलेली कामे, तसेच सम्यकचे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रती असलेल्या भूमिका याची माहितीचे पत्रके वाटण्यात आली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख रोहित डोळस, सातारा जिल्हा निरीक्षक रोहित भोसले, राजू खरात, युवा पुणे शहर सचिव विपुल सोनवणे, सम्यकचे पुणे शहर उपाध्यक्षा बुद्धाप्रिया जगताप, प्रसिद्धी प्रमुख राज सरोदे, युवा नेते अभिजित बनसोडे, कौशल जळकोटकर, अनुप मुंजामकर, पंचशिल येडके अमृता शिंदे, सुजल कांबळे, साक्षी हिरे, प्रतिक जाकाते, सूर्यकांत गांगुर्डे, विष्णू जगताप तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.