अकोला: वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते, सुजाता आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी बाळापुर तालुक्याच्या वतीने वेळा येथील ख्वाजा बुलंद शाह बोली दर्गा येथे चादर चढविण्यात आली.
यावेळी श्रीकांत घोगरे (युवा आघाडी जिल्हाध्यक्ष), राजकुमार दामोदर (जिल्हा महासचिव), ॲड. सुबोध डोंगरे (जिल्हा उपाध्यक्ष), निलेश इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य), संदीप वानखेडे (वंचित बहुजन आघाडी बाळापुर तालुका अध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती.