Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टी’ कार्यालयाबाहेर बॅनर ‘याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे’ : सरकारला इशारा

mosami kewat by mosami kewat
September 13, 2025
in बातमी, राजकीय
0
बार्टी’ कार्यालयाबाहेर बॅनर ‘याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे’ : सरकारला इशारा
       
पुणे : संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिवृत्ती प्रश्नावरून राज्यात प्रचंड असंतोष उसळला असून विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयासमोर बॅनरबाजी करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला. या बॅनरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्यही झळकले होते. त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले आहे की, “सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.

समान निकषांच्या नावाखाली फेलोशिप रोखणे योग्य नाही. संशोधक विद्यार्थ्यांना तातडीने न्याय द्यावा. जाहिराती लगेच प्रसिद्ध करून अधिवृत्ती प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे.”

बार्टी, महाज्योती आणि सारथीच्या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिवृत्ती 2023, 2024 व 2025 साठी स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाहीत. तब्बल दोन वर्षे चार महिने अधिवृत्ती प्रक्रिया रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण व संशोधन धोक्यात आले आहे. 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या छात्रवृत्ती जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने हजारो संशोधक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे.

शिक्षण थांबण्याची भीती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढत असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या प्रश्नावर आपल्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डलवर सरकारविरोधात भूमिका आक्रमक केली आहे. यामुळे सर्वच संशोधक विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास निर्माण झाला आहे.

Tags: BannersBARTIFELLOWSHIPgovernmentPrakash Ambedkarprotespunesarthischolarshipstudentvbaforindia
Previous Post

मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीज पाडल्याने रहिवाशांचा संताप – आदित्य ठाकरे गैरहजर का ? वंचित बहुजन आघाडीचा सवाल

Next Post

Election Commission of Maharashtra : निवडणूक आयोगाकडून पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Nepal Next PM : नेपाळमधील जनआंदोलनानंतर सत्तापालट; सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान
बातमी

Nepal Next PM : नेपाळमधील जनआंदोलनानंतर सत्तापालट; सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान

by mosami kewat
September 13, 2025
0

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) सत्तापालटाची मोठी घडामोड समोर आली आहे. सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे Gen-Z (जनरेशन-झेड) तरुणांनी सुरू केलेल्या...

Read moreDetails
Russia Earthquake : रशियाच्या कमचटकाजवळ ७.४ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या धोक्याची शक्यता

Russia Earthquake : रशियाच्या कमचटकाजवळ ७.४ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या धोक्याची शक्यता

September 13, 2025
Beed Protest : वंचित बहुजन आघाडीचा गेवराईत ‘जन आक्रोश’ महामोर्चा

Beed Protest : वंचित बहुजन आघाडीचा गेवराईत ‘जन आक्रोश’ महामोर्चा

September 13, 2025
Election Commission of Maharashtra : निवडणूक आयोगाकडून पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर!

Election Commission of Maharashtra : निवडणूक आयोगाकडून पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर!

September 13, 2025
बार्टी’ कार्यालयाबाहेर बॅनर ‘याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे’ : सरकारला इशारा

बार्टी’ कार्यालयाबाहेर बॅनर ‘याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे’ : सरकारला इशारा

September 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home