अकोला : वंचित बहुजन आघाडीची तेल्हारा तालुक्यातील तळेगाव सर्कल बैठक प्रचंड कार्यकर्त्यांच्या उत्साहात पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडी केंद्रीय कार्यकारणी सदस्य व अकोला जिल्हा समन्वयक ऍड. खतीब साहेब तसेच जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बैठकीचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कार्यकर्ते इरफान अली मिर साहेब यांनी भूषवले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी पक्षाने जाहीर केलेले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवार तळेगाव सर्कलमध्ये विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीत जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, संगीता अढाव, तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, गोपाल कोल्हे, महासचिव मधुसूदन बरींगे, इद्रिस, रतन दांडगे, सदानंद खारोडे, जीवन बोदडे, अन्सार, मोहम्मद, शिरसोली शेख साहेब, वसीम , प्रदीप शिरसाट, प्रसिद्धीप्रमुख सिद्धार्थ गवारगुरू आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटी, मतदारांशी संपर्क वाढवणे व पक्षाचे विचार गावागावात पोहोचवणे याबाबत सविस्तर चर्चा झाली.