Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार – ॲड. एस. के. भंडारे‎‎

mosami kewat by mosami kewat
September 4, 2025
in बातमी
0
संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार – ॲड. एस. के. भंडारे‎‎
       
सांगली : “भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी करूनच समताधिष्ठित समाज उभारता येईल,” असे मत समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड. एस. के. भंडारे यांनी व्यक्त केले.‎‎

पलूस येथे 1 ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित केलेल्या समता सैनिक दलाच्या पहिल्या महिला युनिट कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ह्या कॅम्पसाठी मुंबई, रत्नागिरी, सातारा, धाराशिव, जालना, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यांतील महिला सैनिक विशेष चाचणीद्वारे निवडून सहभागी झाल्या आहेत.‎‎

भंडारे यांनी अनुच्छेद 14 ते 30 पर्यंत दिलेले मूलभूत हक्क, तसेच अनुच्छेद 32 व 226 नुसार नागरिकांना न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच अनुच्छेद 51(क) नुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये अधोरेखित करून राष्ट्रध्वज-राष्ट्रगीताचा आदर, देशरक्षण, स्त्रियांच्या प्रतिष्ठेत उणेपणा आणणाऱ्या प्रथा टाकून देणे इत्यादी जबाबदाऱ्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत असे सांगितले.‎‎

या प्रसंगी पंचशील करिअर ॲकडमीचे हिम्मतराव ओहाळ व कल्पना ओहाळ, लेफ्टनंट जनरल चंदाताई कासले, मेजर जनरल मोहन सावंत, ॲड. वंदनाताई सावंत, मेजर रुपेश तांमगावकर, रविंद्र लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व महिला सैनिक मोठ्या संख्येने हजर होते.‎‎

कार्यक्रमाआधी आष्टा येथे व तासगाव येथे ॲड. भंडारे यांचा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या ट्रस्टीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.‎‎

तसेच सुधा फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, भवनाला कपाट व समाजासाठी खुर्च्या दान देणाऱ्यांचा सन्मान असे उपक्रम पार पडले. तासगाव येथे आयोजित कार्यक्रमात भंडारे यांनी सांगली जिल्हा महाविहार (विपश्यना केंद्र) प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले आणि “दुःखमुक्तीचा मार्ग” या विषयावर प्रबोधन केले.

Tags: ConstitutionMaharashtrasangalivbaforindia
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न

Next Post

भ्रष्ट क्लासेसविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; बार्टीने सात दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ सुजात आंबेडकरांच्या हस्ते प्रसिद्ध
बातमी

औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ सुजात आंबेडकरांच्या हस्ते प्रसिद्ध

by mosami kewat
January 8, 2026
0

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 'बहुजनांचा जाहीरनामा' या शीर्षकाखाली प्रसिद्ध...

Read moreDetails
११४ बंद मराठी शाळा पुन्हा सुरू होणार! मुंबईच्या शिक्षणात ‘वंचित’चा क्रांतीकारक बदल; जाहीरनामा प्रसिद्ध

११४ बंद मराठी शाळा पुन्हा सुरू होणार! मुंबईच्या शिक्षणात ‘वंचित’चा क्रांतीकारक बदल; जाहीरनामा प्रसिद्ध

January 8, 2026
संभाजी आणि चिस्तीया कॉलनीत सुजात आंबेडकरांचा भव्य रोड शो; प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे जंगी शक्तीप्रदर्शन!

संभाजी आणि चिस्तीया कॉलनीत सुजात आंबेडकरांचा भव्य रोड शो; प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे जंगी शक्तीप्रदर्शन!

January 8, 2026
औरंगाबाद मनपा निवडणूक : प्रभाग ८ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसागर, सुजात आंबेडकरांचा विकासाचा नारा

औरंगाबाद मनपा निवडणूक : प्रभाग ८ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसागर, सुजात आंबेडकरांचा विकासाचा नारा

January 8, 2026
सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन!

सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन!

January 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home