Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला तिवसा तालुक्यातून पाठिंबा

mosami kewat by mosami kewat
September 3, 2025
in बातमी
0
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला तिवसा तालुक्यातून पाठिंबा

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला तिवसा तालुक्यातून पाठिंबा

अमरावती : बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तिवसा तालुक्यातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी या आंदोलनासाठी तालुक्यात जनजागृती अभियान सुरू केले आहे, ज्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‎
‎गेल्या अनेक महिन्यांपासून बुद्धगया येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. तथागत गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली, त्या पवित्र महाविहाराचे व्यवस्थापन सध्या मनुवाद्यांच्या हातात असून ते बौद्ध समाजाकडे सोपवावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
‎
‎याच पार्श्वभूमीवर, तिवसा तालुक्यातील बौद्ध जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली 20 ऑगस्टपासून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत गावागावातील बुद्ध विहारांना भेटी दिल्या जात आहेत आणि महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समुदायाकडे असावे, या मागणीच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवली जात आहे.
‎
‎या अभियानामध्ये आत्तापर्यंत वरखेड, चांदुर ढोरे, ठाणा ठुनी, काटसुर, नमस्कारी, जावरा, फत्तेपुर, करजगाव, निंभोरा, डेहणी, शेंदूरजना बाजार, तळेगाव ठाकूर, उंबरखेड, धामंत्री या गावांना भेटी देण्यात आल्या आहेत. हे अभियान 5 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, भांबोरा, पालवाडी, सातरंगाव, वरुडा, दापोरी, भारसवाडी, आखतवाडा, मूर्तिजापूर (तरोडा), मारडा, कुऱ्हा, चेनुष्ठा, जहागीरपूर, धारवाडा, कौंडण्यपूर या गावांमध्येही जनजागृती केली जाणार आहे. या अभियानाचा समारोप 5 सप्टेंबर रोजी बोर्डा येथे होणार असल्याची माहिती सागर भवते यांनी दिली.
‎
‎हे जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, सचिन जोगे, भारत दहाट, मनीष खरे, सागर गोपाळे, नितीन थोरात, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, आणि डॉ. धर्मेंद्र दवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Tags: amravatiBalasaheb AmbedkarBuddha GayaGautam BuddhaMahabodhiMovementSocial movement
Previous Post

जात बदलून मिळते का?

Next Post

सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; वृक्षारोपणाने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश

Next Post
सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; वृक्षारोपणाने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश

सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; वृक्षारोपणाने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home