Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन, वाहतुकीत बदल: ‘या’ मार्गांवर बंदी!‎‎

mosami kewat by mosami kewat
August 29, 2025
in बातमी
0
मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन, वाहतुकीत बदल: ‘या’ मार्गांवर बंदी!‎‎
       
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केली आहे. आज सकाळी जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. ते आज आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतुकीमध्येही बदल करण्यात आले आहेत.‎‎

मुंबई वाहतुकीत बदल: पोलिसांनी जारी केले नवीन आदेश‎‎

मुंबई पोलिसांनी २९ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या या आंदोलनामुळे वाहतुकीत बदल केले आहेत. मोर्चातील सहभागी लोक पायी, मोटरसायकल, कार आणि इतर वाहनांनी येत असल्याने, काही मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.‎‎

वाहतुकीस बंदी असलेले मार्ग (आवश्यकतेनुसार):‎‎

१ ) वाशीहून येणाऱ्या आणि पांजरपोळ-फिवे कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना साऊथ बॉण्ड मार्गावर प्रवेश नाही.‎‎

२) वीर जिजाबाई भोसले मार्गावरुन ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या वाहनांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत.‎‎

३) छेडानगरवरुन फ्री वेला जाणाऱ्या वाहनांनाही बंदी आहे.‎‎

या मार्गांसाठी पर्यायी मार्ग :

‎- वाशीहून येणाऱ्या वाहनांनी मानखुर्द टी जंक्शन ब्रीज स्लिप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आयओसी जंक्शन आणि छेडानगर मार्गे मुंबई शहरात प्रवेश करावा.

– घाटकोपर मानखुर्द लिंक रोडने ट्रॉम्बे आणि फिवेला जाणाऱ्या वाहनांनी छेडानगर मार्गे मुंबई शहरात प्रवेश करावा.

‎‎- छेडानगरवरुन फ्री वेला जाणाऱ्या वाहनांनी उजवीकडे वळून अमरमहल, नेहरूनगर ब्रीज, सुमननगर जंक्शन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने शहरात प्रवेश करावा.

‎‎हे आदेश २९ ऑगस्ट, २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील.

Tags: azad maidanManoj JarangeMaratha ReservationmumbaipoliceRouteSouth Bound routeTraffic
Previous Post

मोदींची डिग्री शोधण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून रस्ते खोदकाम – प्रकाश आंबेडकर

Next Post

वडुले येथील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबियांची ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home