नागपूर : वंचित बहुजन आघाडी वडोदा जिल्हा परिषद सर्कल, तालुका कामठी कार्यकारिणी गठित करण्यासाठी मुलाखत बैठक भूगाव येथील समाज भवनात संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी भूषविले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महासचिव राजेश ढोके आणि कार्यालयीन सचिव वैभव येवले उपस्थित होते. कार्यकारिणी पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या. मुलाखतीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडोदा जिल्हा परिषद सर्कलसंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
वडोदा सर्कल तालुका कामठी येथील कार्यकर्त्यांमध्ये जगदीश रंगारी, नयन जामगडे, दिनेश मेश्राम, अमरदीप मेश्राम, संयोग राऊत, अनिल वानखेडे, रितिक गजभिये, अक्षय लोखंडे, दिलीप सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.