नाशिक : वंचित बहुजन आघाडी, सिन्नर तालुक्याची बैठक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ भालेराव, नाना पवार, नंदूभाऊ पगारे, लीनाताई खरे, उषाताई निरभवणे, दीपक भंडारी, योगेश वाघमारे, रवी पगारे, भा.बौ.म. तालुका अध्यक्ष हेमंत निकम, तालुका निरीक्षक सागर रिपोर्टे व प्रशांत अहिरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सिन्नर तालुक्यातील पक्ष बांधणी, तालुका व शहर कार्यकारणी तसेच होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना “तालुक्यातील पक्षाचे काम अधिक मजबूत करण्यासाठी सुसंघटित कार्यकारणीची गरज आहे,” असे स्पष्ट केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही आपली मते मांडली. तालुका अध्यक्ष व सिन्नर शहराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांची नावे सुचवण्यात आली असून, लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन गांगुर्डे यांनी दिले.
या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी विल्यम शिंदे, अशोक घेगडमल, समशेर कादरी, अविनाश जगताप, धम्मानंद डोंगरदिवे, संजय जगताप, प्रमोद गवारे, शोभा खरात, जगन्नाथ जारे गुरुजी, सचिन पठारे, निलेश रोकडे, मिथुन लोंढे, प्रवीण रणशवरे, राजुमामा रिपोर्टे, विशाल पठारे, राहुल जाधव, रोहित निकाळे, वैभव भाबड, केशव डोंगरे, भारत शेळके, नानाभाऊ जाधव यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.