धाराशिव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार तुळजापूर येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील वंचित, शोषित आणि पीडित समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सातत्याने काम करत असून, याच प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. भर पावसातही शेकडो कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते.
तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या धाराशिव जिल्हा पक्ष संघटनेची आढावा बैठक पार पडली. पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि संभाव्य नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि ताकदीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा प्रभारी ॲड. रमेश गायकवाड, युवक आघाडी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रणित डिकले, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्धार करण्यात आला. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ज्यात जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड, नासिर शेख, रविकिरण बनसोडे, रुस्तमखा पठाण,
जिल्हा संघटक विकास बनसोडे, परमेश्वर लोखंडे, प्रवक्ता ॲड. के. टी. गायकवाड, शिवाजी कांबळे, उमेश कांबळे, अमोल शेळके, सुधीर वाघमारे, गोविंद भंडारे, जीवन कदम, विनायक दुपारगुडे, माजी जिल्हाध्यक्ष बी. डी. शिंदे, मिलिंद रोकडे, रामभाऊ गायकवाड, उमाजी गायकवाड, आम्रपाली गोतसुर्वे, पंकज सोनकांबळे, नितीन सीतापुरे आणि सहदेव कांबळे यांचा समावेश होता, ते सातत्याने पाऊस सुरू असतानाही बैठकीला उपस्थित राहिले.
Dhamma Chakra Pravartan Din 2025 : मोदींना टाटा, बाय बाय करा आणि देश वाचवा; ओबीसी समाजाने वेळीच सावध व्हावे – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोल्यात धम्म मेळाव्याला उसळला जनसागर अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन...
Read moreDetails